sports

परळीत पशुचिकित्सा शिबिरास पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती सातारा आणि पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 परळी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी येथे दि. 26 फेब्रुवारी रोजी पशुचिकित्सा शिबिर पार पडले.

सोनवडी : पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती सातारा आणि पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 परळी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी येथे दि. 26 फेब्रुवारी रोजी पशुचिकित्सा शिबिर पार पडले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैया भोसले, सातारा पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव,  जिल्हा परिषद सदस्या कमल जाधव, विद्या देवरे, परळीचे सरपंच बाळासो पाटील, नंदकुमार गुरव, रोशनी कटाळे, आरती परळे, सोमा दळवी, अशोकराव काटाळे, गजानन दळवी, तानाजी गुजर, सुरेश कोठावळे, सर्जेराव गंगावणे, सुधाकर राऊत, गोविंद वेदपाठक, नंदकुमार पानसरे, लक्ष्मण पाटील, संभाजी देशमुख, पांडुरंग सुतार, अण्णा परळे, सुरेश दळवी तसेच परळीत परिसरातील ग्रामस्थ व पशुपालक उपस्थित होते. 

पशुसंवर्धन विभागाकडील डॉ. स्मिता मलगुंडे, डॉ. माधव जाधव, राजू कदम, बलदेव निकम, नलावडे, जीवन गायकवाड तसेच पशुवैद्यकीय दवाखाना परळी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. अर्चना नेवसे-जठार यांनी शिबिराच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

पशुचिकित्सा शिबिरामध्ये सर्व पशुपालकांना गोचिड निर्मूलनाची औषध देण्यात आली. तसेच वंध्यत्व असलेल्या जनावरांची वंध्यत्व तपासणी करण्यात आली. यावेळी जनावरांना विटामिन ए, डी, थ्री तसेच मिनरल मिक्स्चरचे वाटप करण्यात आले.