जमिनीचा सात-बारा व सर्च रिपोर्ट देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मसूर सजाचा तलाठी व अन्य एकास अँटीकरप्शनने अटक केली आहे. तलाठी निलेश सुरेश प्रभुणे वय 45, रा. मलकापूर, संगमनगर, ता. कराड आणि रविकिरण अशोक वाघमारे वय 27 रा. मसूर ता. कराड अशी त्यांची नावे आहेत.
सातारा : जमिनीचा सात-बारा व सर्च रिपोर्ट देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मसूर सजाचा तलाठी व अन्य एकास अँटीकरप्शनने अटक केली आहे. तलाठी निलेश सुरेश प्रभुणे वय 45, रा. मलकापूर, संगमनगर, ता. कराड आणि रविकिरण अशोक वाघमारे वय 27 रा. मसूर ता. कराड अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, मसूर, ता. कराड येथील जमिनीचा सात-बारा उतारा व सर्च रिपोर्ट देण्यासाठी तक्रारदार हे मसूर येथील तलाठी कार्यालयात गेले होते. या कामासाठी संबंधित तलाठी प्रभुणे याने दोन हजारांची लाच मागितली. त्यांच्याविरोधात तक्रारदाराने सातारा येथील लाचलूचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केले. त्यानंतर अँटिकरप्शन विभागाने दि. 27 रोजी पडताळणी करून दि. 28 रोजी सापळा लावला. यावेळी रविकिरण वाघमारेने ही रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई लाचपुत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक (पुणे) मा. श्री.राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक (पुणे) सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा युनिटचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पो.ना राजे, पो. कॉ. काटकर, येवले, भोसले, पो. ना. अडागळे (चालक) आदींनी केली.