ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्त करण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या कराड, ता. कराड येथील तलाठी सागर दत्तात्रय पाटील यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
सोनगिरीवडी आणि सिद्धनाथवाडी, ता. वाई येथील तलाठी पांडुरंग जगन्नाथ भिसे, रा. फ्लॅट नंबर १०४, विराट नगर, वाई याच्या मदतनीस दोन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला. याप्रकरणी तलाठी व त्याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
माण - खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सुर्यवंशी व माणचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार हेमंत दिक्षीत यांनी वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे.
सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे. शाहुनगर,विलासपूर, गोडोली हा संपूर्ण भाग शहर हद्दीत समाविष्ट झाला आहे. येथील रहिवासी नागरीकांच्या सोयीसाठी गोडोली येथे स्वतंत्र नवीन तलाठी सजा व कार्यालय निर्माण करावे, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारचे जिल्हाधिकारीशेखर सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष यांच्या सुचेनुसार व जावळी तालुकाध्यक्ष एस. ए.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तालुका संघटनेचे सरचिटणीस डी. एन. आंबवणे व कार्याध्यक्ष एस. व्ही. ढाकणे यांच्या नेतुत्वाखाली मेढा येथील तहसील कार्यालयासमोर तालुका तलाठी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले, तसेच निदर्शनेही करण्यात आली.
जमिनीचा सात-बारा व सर्च रिपोर्ट देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मसूर सजाचा तलाठी व अन्य एकास अँटीकरप्शनने अटक केली आहे. तलाठी निलेश सुरेश प्रभुणे वय 45, रा. मलकापूर, संगमनगर, ता. कराड आणि रविकिरण अशोक वाघमारे वय 27 रा. मसूर ता. कराड अशी त्यांची नावे आहेत.