maharashtra

दोन हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्याचा मदतनीस जाळ्यात


Talathi's helper in the net while accepting a bribe
सोनगिरीवडी आणि सिद्धनाथवाडी, ता. वाई येथील तलाठी पांडुरंग जगन्नाथ भिसे, रा. फ्लॅट नंबर १०४, विराट नगर, वाई याच्या मदतनीस दोन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला. याप्रकरणी तलाठी व त्याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सोनगिरीवडी आणि सिद्धनाथवाडी, ता. वाई येथील तलाठी पांडुरंग जगन्नाथ भिसे, रा. फ्लॅट नंबर १०४, विराट नगर, वाई याच्या मदतनीस दोन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला. याप्रकरणी तलाठी व त्याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार यांनी त्यांच्या चुलत भावाकडून खरेदी केलेल्या २ गुंठे प्लॉटच्या सातबारावरील ३२ ग ची नोंद कमी करण्यासाठी तलाठी पांडुरंग जगन्नाथ भिसे याने तक्रार यांच्याकडे २ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. याबाबत पडताळणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्यानंतर लाच प्रतिबंधक विभागाने आज दि.२३ रोजी वाई येथील चावडी चौक येथे सापळा लावला असता तलाठी पांडुरंग जगन्नाथ भिसे यांचा मदतनीस संतोष चंद्रकांत भिलारे, रा. धावडी, ता. वाई याला २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन अंकुश राऊत, विक्रम पवार पोलीस नाईक खरात, अडागळे, पोलीस कॉन्स्टेबल काटकर यांनी सहभाग घेतला.