घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटक आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी आहेत.
घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटक आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी आहेत. आज आपण लवंग खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत..
लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातांदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते. लवंग ही गरम असते. यामुळे सर्दी-खोकला झाल्यावर लवंग खावी किंवा याची चहा बनवून पिणे फायदेशीर आहे. लवंगेचा एक काळ सर्दी, पडसे किंवा खोकल्याकरिता घरगुती औषध म्हणून मोठा वापर होता. विडयाच्या पानाबरोबर मसाल्यात वापर म्हणून लवंग असे. लवंगेचे संस्कृत नाव देवकुसुम आहे. दाबल्यानंतर ज्यातून तेल निघते ती लवंग चांगली. लवंगेचे तेल पाण्यापेक्षा जड असते. लवंग तिखट, कडू रसाची असून लघु गुणांची म्हणून डोळयांना हितकारक आहे. पाचक व रुची उत्पन्न करणारी प्रामुख्याने कफ विकारावर व काही प्रमाणात पित्त व कफ विकारावर काम करते.
ग्रंथाप्रमाणे लवंग अग्निप्रदीपक, पोटदुखी, तहान, खोकला, कफ, दमा, उचकी, क्षय, मुखदरुगधी, उलटी, पोटदुखी, रक्तविकार इत्यादींवर काम करते.
लवंगेचा फाजील वापर केल्यास डोळे, मूत्राशय व हृदयावर परिणाम वाईट होतो. तोंड येते, जिभेला जखम होते. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे प्राणवह स्त्रोतसाच्या सर्व विकारात लवंग उत्तम काम करते. सर्दीने सतत नाक वाहत असेल तर एकएक करून तीन-चार लवंग लागोपाठ चघळाव्या. सर्दी लगेच थांबते. लवंगेत तेल आहे. त्याचा विशद गुण आहे. त्यामुळे घसा, गळा, गाल, जीभ सर्व स्वच्छ राहते. लवंगेचे तेल सर्दीकरिता अत्यंत उपयुक्त आहे. रुमालावर दोन थेंब तेल टाकले की, त्याच्या हुंगण्याने नाक मोकळे होते. सवय लागत नाही. कपाळावर लवंग, सुंठ व वेखंड असा उगाळून गरम गरम लेप लावावा. जुनाट सर्दी बरी होते. तोंडात घाण वास येत असल्यास लवंग तेल व पाणी अशा गुळण्या कराव्या. दुखर्या दातांकरिता लवंग तेल, कापूस व किंचित तूप असा बोळा ठेवावा. तेल फार वापरू नये.
बाजारात दाताच्या आरोग्याकरिता लवंग असलेली टूथपेस्टची जाहिरात असते. या जाहिरातीच आहेत हे लक्षात ठेवावे. दाताच्या आरोग्याकरिता त्याऐवजी गेरू, कात व किंचित लवंग चूर्ण हे उत्तम दंतमंजन दातांच्या पायोरिया या विकारात उपयोगी पडते. वृद्धांच्या ठसका, खोकला, आवाज बसणे, गाणारे गायक किंवा वक्ते, अध्यापक यांच्याकरिता लवंग नेहमी जवळ असावी अशी उपयुक्त आहे. गाणे, भजन म्हणावयाचे असेल, व्याख्यान द्यावयाचे असेल तर लवंग तोंडात धरावी एक मिनिटाने कार्यक्रम सुरू करावा. स्पष्ट मोकळा आवाज होतो. लवंग उष्ण आहे. पण शरीर क्षीण करीत नाही. उलट लवंग ओज, शुक्र, वीर्यवर्धक आहे. ज्या माणसाला भरपूर काम करावयाचे आहे. दिवसाचे 24 तास काम आहे त्याने जरूर लवंग खावी. लवंग बुद्धी तल्लख ठेवते. विचारशक्ती दगा देत नाही. समोरचा माणूस बोलावयाला लागला की त्याला उत्तर देण्याकरिता बुद्धी सदैव जागरूक ठेवणारी लवंग आहे. मंदबुद्धी मुलांकरिता लहान प्रमाणात नियमित लवंग द्यावी. जड जेवणामुळे जर अन्न वर येत असेल तर एक-दोन लवंगा चावून खाव्यात. क्षयाचा खोकला, स्वरभंग याकरिता नियमित लवंग ऋतुमान बघून खावी. माझ्या वापरातील अनेक औषधी गुणवान कल्पात लवंग हे एक घटकद्रव्य आहेच.