By वडूज प्रतिनिधी I आकाश यादव Wed 18th Nov 2020 03:48 pm
वडूज : येरळा धरणाच्या जुन्या नदीपात्रात मगर असल्याचे आज काही नागरिकांना दिसून आले. त्यानंतर आज रात्री वनविभाग तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. येरळा नदी पात्रात मगर असल्याचे समजताच परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे नदी पात्रात पाण्यात वाढ झाली होती. त्यामुळे येरळा धरणातील पाणी पातळीवाढून धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. या वाढत्या व वाहत्या पाण्यातून ही मगर येरळा धरणात आली असल्याचा प्राथमिकअंदाज नागरिक व प्रशासनाने व्यक्त केला. आज दुपारी या परिसरातील नागरिकांना याठिकाणी मगरीचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती.
याबाबत नागरिकांनी वनपरिक्षेत्रपाल शीतल फुंदे यांना संपर्क साधला असता वनविभागाने तातडीने याठिकाणी भेट देत परिसरात पाहणी केली. दरम्यान वनविभागाचे कर्मचारी सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख घटनास्थळी दाखल झाले आहेत. मगर असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी याठिकाणी बघण्यासाठी गर्दी केली आहे. मगरीला पकडण्याचे काम सुरू असल्याचे समजते