sports

केंद्राच्या सेंट्रल रोड फंड योजनेत जिल्ह्यातील अनेक कामांचा समावेश होईल

खा. उदयनराजे भोसले : ना. नितीन गडकरी यांच्याकडे विकासकामांच्या निधीसाठी केली मागणी

‘केंद्र सरकारच्या सेंट्रल रोड फंड योजनेतून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांना सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामे मार्गी लावण्याविषयी विनंती केली असून, ना. नितीन गडकरी यांनी सेंट्रल रोड फंडामधून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न येणार्‍या अंदाजपत्रकात केला जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. ना. गडकरी यांचा दिला शब्द खरा करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे केंद्राच्या सेंट्रल रोड फंड योजनेत सातारा जिल्ह्यातील अनेक कामांचा समावेश होईल आणि त्याकरिता भरीव निधी मिळेल,’ असा

सातारा : ‘केंद्र सरकारच्या सेंट्रल रोड फंड योजनेतून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांना सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामे मार्गी लावण्याविषयी विनंती केली असून, ना. नितीन गडकरी यांनी सेंट्रल रोड फंडामधून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न येणार्‍या अंदाजपत्रकात केला जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. ना. गडकरी यांचा दिला शब्द खरा करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे केंद्राच्या सेंट्रल रोड फंड योजनेत सातारा जिल्ह्यातील अनेक कामांचा समावेश होईल आणि त्याकरिता भरीव निधी मिळेल,’ असा विश्‍वास खा. उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

खा. उदयनराजे यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे नमूद केले आहे की, ग्रेड सेपरेटरकरिता ना. गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळेच आज सातारा सारख्या विकसनशील शहरामध्ये ग्रेड सेपरेटर सारखे देखणे आणि दूरगामी चांगला परिणाम करणार्‍या विकासकामाचे लोकार्पण करण्यात आले आहे. यापूर्वीही ना. गडकरी यांनी सेंट्रल रोड फंड मधून सातारा जिल्ह्याकरिता सतत झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विकासकामांचा समावेश केला जाणार आहे.

यामध्ये 1. राज्य महामार्ग क्र.148 मौजे डिचोली-नवजा-हेळवाक-मोरगिरी-गारवडे-साजुर-विंग-वाठार रेठरे-शेणोली स्टेशन रोड, 2.  जावळी,वाई-पाचवड-मेढा रोडचे एमडीआर 19- 47.000 ते 53.000 अखेर रस्त्याचे रुंदीकरण, 3. राज्य महामार्ग क्र. 139 पोलादपूर-महाबळेश्‍वर-वाई-भाडळे रस्त्याची सुधारणा करणे,  4. एमडीआर-25, पाचगणी- कुडाळ- खडकी- चांदवडी-जाब-किकली-म्हापरवाडी-लगडवाडी रस्ता सुधारणा करणे, 5. कराड शहराच्या पूर्वेकडील तासवडे शहापूर ते पाचवडफाटा अखेररिंगरोड तयार करणे, 6. कराड शहराच्या पश्‍चिमभागाकडील साकुर्डे ते पाचवड फाटा अखेर रिंगरोड तयार करणे, 7. राज्य महामार्ग क्र.146,/60 पुसेगाव-वडूज-कातरखटाव ते राज्य महामार्गाचे रुंदीकरण आणि सुधारणा, 8.  कोरेगाव रहिमतपूर- अंभेरी -वडूज रोड एमडीआर 38 -00.00 ते 29.000 अखेर रस्ता सुधारणा करणे आदी कामांसह आणखीन काही कामे ना. गडकरी यांना सुचविणेत आलेली आहेत. त्यामुळे या विकासकामांपैकी शक्य तितक्या जास्त कामांना केंद्राच्या अंदाजपत्रकात तरतूद करुन, मार्गी लावण्याचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामध्ये सर्वांच्या सहकार्याने यश येईलच, असेही खा. उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.