sports

कोरोना मुक्त झालेले वैद्यकीय अधिकारी महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार


वैद्यकीय अधिकारी यांनी सुरुवाती पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चांगल्या प्रकारे काम केले आहे. दरम्यान ते स्वतः पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या वर उपचार करण्यात आले. त्यांनी ही कोरोनावर मात करत ते पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाले. या दोन्ही ही योद्धांचा आज पोलीस प्रशासनाने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करीत असताना वडूज येथील एक वैद्यकीय अधिकारी आणि एक महिला पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली. या कोरोनाच्या आजारातून मुक्त होऊन ते पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाल्याने आज वडूज पोलिसांनी या दोन योद्धांचा सत्कार करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यभरात कोरोना योद्धे डॉक्टर, पोलीस, पत्रकार परिचारिका व आरोग्य सेवक कोरोना बाधित होत आहे,इ पण आनंदाची बाब अशी की अनेक जण कोरोनावर मात करत आहेत. यामध्ये वडूज येथील महिला पोलीस अधिकारी यांचा मागील काही दिवसांपूर्वी कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यांनी उपचार घेत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पोलीस सेवेसाठी दाखल होताच त्यांचे पोलिस प्रशासनाने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच वडूज ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांचा ही कोरोना अहवाल गेल्या दहा दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी सुरुवाती पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चांगल्या प्रकारे काम केले आहे. दरम्यान ते स्वतः पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या वर उपचार करण्यात आले. त्यांनी ही कोरोनावर मात करत ते पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाले. या दोन्ही ही योद्धांचा आज पोलीस प्रशासनाने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्या सह पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.