कसबा पेठे मध्ये भाजपच्या पॉवर बँकेने महाविकास आघाडीचा विजय खेचून आणलेला आहे. त्यामुळे वडूज नगरीत फटाक्यांची आतषबाजी करुन कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
वडूज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून वावरणाऱ्या तोतया पोलिसाला वडूज पोलिसांनी शिताफीने पकडले असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.
वडूज येथील झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे पावणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पदाधिकारीपदी सभासद परिवर्तन पॅनलच्या संचालकांना संधी मिळाली असून चेअरमनपदी नवनाथ जाधव यांची, तर व्हाईस चेअरमनपदी शशिकांत सोनवलकर यांची निवड करण्यात आली आहे. 18 विरुद्ध 3 अशा मताधिक्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या.
वडूज येथे घरफोडी झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
वडूज ता खटाव येथील सामान्य शेतकरी भिमराव मारुती गोडसे यांना एका जंगली वानराने कमरेला धारदार नखे लावून गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे सणासुदीला शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोक्सो मधील आरोपीस काही तासातच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
खटाव तालुक्यातील वडूज या ठिकाणी शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेले शिवसेना तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे व कट्टर शिवसैनिक युवराज पाटील, बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संतप्त शिवसैनिकांनी मंत्री एकनाथ शिंदे, शुभराज देसाई, आ. महेश शिंदे यांच्या फोटोला उलटे टांगून लाल मिरच्यांची धुरी दिली.
आरंभ प्रशिक्षण केंद्राचा वडूज अंगणवाडी सेविका मार्फत भव्य दिव्य शुभारंभ करण्यात आला. बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी लहान मुलांच्या मानसिक बदल, त्यांची आवडनिवड व इतर गोष्टींच्या बाबत योग्य पद्धतीने अंगणवाडी सेविका यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.
संपूर्ण खटाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या वडूज विकास सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पक्षीय चेहरा असलेल्या शेतकरी परिवर्तन विकास पॅनेलच्या शिट्टीने बारा जागा जिंकून दहा वर्षाने परिवर्तन करून बाजी मारली. कपबशीला एका जागी यश मिळाले.
मायणी (ता. खटाव) येथे मागासवर्गीय मृत व्यक्तीची बनावट सही व कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याच्या गुन्ह्यात दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. त्याबाबत अटकपूर्व जामीन अर्ज वडूज न्यायालयाऐवजी अन्य न्यायालयात चालवण्यासाठी भाजपचे आ. जयकुमार गोरे यांच्यावतीने सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तो फेटाळला आहे. आता जामिनाबाबत वडूज न्यायालयातच सुनावणी होणार आहे.
गेली चार महिने विना वेतन असूनही वडूज एसटी आगारात एसटी कर्मचारी नेटाने राज्य सरकारमध्ये कर्मचाऱ्यांचे विलनीकरणाच्या मागणीसाठी ठाम आहेत. त्यांना पाठिंबा व मदतीचा हात देण्यासाठी येरळवाडी, ता. खटाव येथील एस. टी. कर्मचारी गोरखनाथ चव्हाण यांचे सुपुत्र युवा नेते धनंजय चव्हाण यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला असून मदतीचा हात म्हणून त्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
खटाव तालुक्यातील वडूज मधील अत्याधुनिक जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करा, अशी मागणी मनसेचे जिल्हा संघटक (स्वयंरोजगार) सुरज लोहार यांनी खटाव तहसिलदार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
वडूज आगार प्रशासनाच्या वतीने सात अधिकारी, कर्मचार्यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांमध्ये वाहतुक नियंत्रक संभाजीराव इंगळे, सहाय्यक वाहतुक अधिक्षक पोपटराव सानप, चालक हणमंतराव जठार, कार्यशाळा कारागीर बाळासाहेब देशमाने, अरुण जाधव, वाहक कदम (पुसेसावळी), वॉचमन काळे यांचा समावेश आहे.
वडूज परिसरात सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या नागरिकांना आज मॉर्निंग वॉक चांगलेच महागात पडले. विनामास्क व विनाकारण सकाळी फिरल्याच्या कारणावरून पोलीसांनी ५६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल २९ हजार रूपयांचा दंड वसूल केला. आज पहाटे वडूज शहर परिसरातील पेडगाव रोड, भागांत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व नियम मोडणाऱ्या नागरिकांवर सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी ...
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख हरणाई सहकारी सूतगिरणी व माणदेशी प्रबोधनकार सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून वडूज येथे सुसज्ज कोविड सेंटर उभारणार आहेत.
उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांच्या आदेशान्वये वडूज शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वडूज नगरपंचायत व प्रशासकीय अधिकार्यांनी शहरामध्ये शुक्रवार, दि. 23 ते 30 एप्रिलअखेर ‘जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला असून, याबाबतचा निर्णय हुतात्मा स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
येथील ग्रामीण रुग्णालयातील अपुर्या कर्मचारी वर्गाचा फटका आता कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये चांगलाच बसू लागला आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारीच नसल्याने याठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांनाच अन्य कर्मचार्याला सोबत घेऊन कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह उचलावे लागत आहेत.
येथील महावितरणच्या उपविभाग अंतर्गत वडूज शहर शाखा अंतर्गत थकबाकीदार ग्राहकांकरिता वीजबिल धडक वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. वीजबिल भरा नाहीतर वीज पुरवठा तत्काळ खंडित या धोरणानुसार प्रत्यक्ष ग्राहकांची भेट घेऊन व ग्राहकास ऑनलाइन प्रणालीद्वारे वीजबिल भरण्यास प्रेरित करून थकीत ग्राहकांचे वीजबिल भरून घेण्यात येत आहे. तसेच थकीत वीजबिल न भरणार्या ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात येत आहे.
येथील जे. सी. शहा पेट्रोल पंपावरून दुचाकीच्या डिक्कीतील अडीच लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. आज दुपारी तीन वाजता घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. घडलेली सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
वडूज येथे शासनाचे नियम व अटींचे पालन करीत शिवजयंती सोहळा सर्व प्रकारची काळजी घेत संपन्न झाला. येथील बॉक्सर ग्रुप आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करीत येणारे संकट दूर होऊन ही प्रजा सुखी व्हावी, यासाठी नतमस्तक झाले. सकाळी 11 वाजता पारंपरिक पद्धतीने वाकेश्वर येथील संतोष संभाजी फडतरे यांच्या ‘सर्जा राजाची’च्या बैलजोडी सजवून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली. जय जिजाऊ जय शिवराय, असा जयघोष करीत शहरातून भव्य मिरवणूक
खटाव तालुक्यातील शिरसवडी येथे बाधित रुग्ण सापडत आहेत. याठिकाणी दि ९ रोजी बुधवारी ३ बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये २० वर्षीय महिला, ४२ वर्षीय महिला तसेच ४६ वर्षीय पुरुष यांचा यामध्ये समावेश आहे. तर काल दि ११ रोजी २९ वर्षीय पुरुष हा शिरसवडी गावात बाधित रुग्ण सापडला आहे. त्यामुळे याठिकाणी तहसीलदार डॉ अर्चना पाटील, गटविकास अधिकारी काळे, तालुका वैद्यकीय अधीकारी डॉ. युनुस शेख, वैद...
सध्या वडूज शहरात आज पासून जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून ठीक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या वाहन धारकावर कारवाई केली जात आहे. त्यातच आज वडूज येथे चक्क दुचाकीवर फोन वर बोलत विना मास्क घालता एक ग्रामसेवक शहरात फिरत होते. दरम्यान पोलिसांनी त्यांना थांबवून मास्क न वापरला याबाबत काही रुपयांचा दंडाची पावती केली . मात्र मी ग्रामसेवक आहे. माझ्याकड...
पुण्यात बेदरकारपणे बस चालवून नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले संतोष माने प्रकरण अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. असाच प्रकार आज वडूज येथे घडला. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख तसेच शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानाने हा अनुसूचित प्रकार टळला आणि अनेकांचे जीव वाचले.
वडूज शहरातील सर्व सलून व्यवसायिकांना दि ७ पासून आपले व्यवसाय बंद करण्याच्या सूचना वरून दिल्या आहेत. त्या प्रमाणे वडूज शहरातील सलून व्यवसाय ८ दिवसासाठी बंद ठेवली जाणार असल्याची माहिती वडूज नाभिक समाजचे अध्यक्ष शांताराम चव्हाण यांनी दिली आहे.
वैद्यकीय अधिकारी यांनी सुरुवाती पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चांगल्या प्रकारे काम केले आहे. दरम्यान ते स्वतः पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या वर उपचार करण्यात आले. त्यांनी ही कोरोनावर मात करत ते पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाले. या दोन्ही ही योद्धांचा आज पोलीस प्रशासनाने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली. सपोनि देशमुख यांनी तात्काळ आपली टीम घेऊन खाजगी वाहनाने सदर ठिकाणी जाऊन छापा मारला. त्या ठिकाणी तीन ट्रॅक्टर व आठ इसम अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. यातील दोन ट्रॅक्टर व तीन लोकांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून इतर पाच जण व एक ट्रॅक्टर घेऊन फरार झालेले आहेत.
केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनचा मार्ग बंद करून राज्यातील एसटी बस पुन्हा पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी बहुजन वंचित आघाडीच्यावतीने एसटी आगार आवारात हलगी वादन आंदोलन करून प्रशासनास जाग आणण्याचा प्रयत्न केला.