sports

खटाव तालुक्यातील शिरसवडीत कोरोना बाधित रुग्ण


खटाव तालुक्यातील शिरसवडी येथे बाधित रुग्ण सापडत आहेत. याठिकाणी दि ९ रोजी बुधवारी ३ बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये २० वर्षीय महिला, ४२ वर्षीय महिला तसेच ४६ वर्षीय पुरुष यांचा यामध्ये समावेश आहे. तर काल दि ११ रोजी २९ वर्षीय पुरुष हा शिरसवडी गावात बाधित रुग्ण सापडला आहे. त्यामुळे याठिकाणी तहसीलदार डॉ अर्चना पाटील, गटविकास अधिकारी काळे, तालुका वैद्यकीय अधीकारी डॉ. युनुस शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे आदी नी भेट देऊन याठिकाणी बाधित रुग्ण सापडलेला परिसर सील केला आहे. तर प्रतिबंध क्षेत्रातील लोकांनी बाहेर पडू नये अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे