Satara

esahas.com

स. गा. म. महाविद्यालयामध्ये मतदार नावनोंदणी बोर्डाचे अनावरण

रयत शिक्षण संस्थेचे सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड, राष्ट्रीय सेवा योजना, महिला मिलिटरी, जिमखाना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना आणि निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'विशेष संक्षिप्त पुनरिक्षण' मतदार नावनोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मतदान नोंदणी संदर्भातील बोर्डाचे अनावरण करण्यात आले.

esahas.com

महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करणार : खा. शरदचंद्रजी पवार

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व लगतचे तालुक्यांमध्ये स्ट्रॅाबेरी पिकाचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. महाबळेश्वर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनाचे ठिकाण असून शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पिक आहे. देशामध्ये ४००० एकर क्षेत्रावर स्ट्रॅाबेरी पिकाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी ३००० एकर क्षेत्र हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व लगतच्या तालुक्यातील आहे.

esahas.com

आठवडाभराच्या प्रयत्नानंतर बिबट्याला कैद करण्यात वनविभागाला यश

येणके, ता. कराड येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने ऊसतोड मजुराच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती. अखेर सुमारे आठवडाभराच्या प्रयत्नानंतर  बिबट्याला सापळ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र, एका बिबट्याला कैद केल्यानंतर सुमारे तासाभरातच येणके गावामध्येच दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

esahas.com

चाळकेवाडी येथे पवनचक्कीमधील साहित्याची चोरी

चाळकेवाडी, ता. सातारा येथे पवनचक्कीमधील साहित्याची चोरी झाली असल्याची घटना घडली आहे.

esahas.com

वडूथ येथील घरफोडीत सुमारे तीन लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरीस

वडूथ, ता. सातारा येथे झालेल्या घरफोडीत सुमारे तीन लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरट्यांनी लांबवला असल्याची घटना घडली आहे.

esahas.com

सातार्‍यात धूम स्टाईल चोरी; सुमारे 90 हजारांचा ऐवज लांबवला

सातार्‍यातील एसटी स्टॅन्ड पाठीमागे पारंगे चौकात मुंबईची प्रवासी असणार्या महिलेची पर्स धूम स्टाईलने आलेल्या बाईकर्सने चोरी केली. याप्रकरणी अर्चना श्रीरंग ढगे (वय 29, सध्या रा.दहिसर, मुंबई मूळ रा.सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

esahas.com

सोशल मीडियावर कारखान्याची बदनामी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सोशल मीडियावर खोटी कागदपत्रे बनवून साखर कारखान्याची बदनामी होईल, अशी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी २६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कारखान्याच्या प्रशासन विभागातील क्लार्क रणजीत कदम यांनी फिर्याद दिली आहे. ओमकार अरुण साळुंखे रा. रेठरे खुर्द ता. कराड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

esahas.com

चांगल्या आरोग्यासाठी पांढरे तूप खावे की पिवळे तूप

आपण रोजच्या जेवणात अनेक खाद्यपदार्थांमध्ये तूप वापरतो. त्यात असे अनेक पोषक घटक असतात. जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले ठरतात. आयुर्वेदातही याला औषध मानले जाते. प्राचीन काळापासून शरीरातील रोगांची लक्षणे नष्ट करण्यासाठी सात्विक आहारात तुपाचा वापर केला जातो. देशी तूप अन्नाला चव आणि गुळगुळीतपणा तर देतोच, पण त्यात भरपूर पोषकही असतात.

esahas.com

कराडात मनसेकडून संविधान प्रस्तावना प्रतिमेचे पूजन

भारतामध्ये २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले. परंतु, २६ नोव्हेंबर १९४९ रोजीच संविधान औपचारिकरीत्या स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मुल्यांचा प्रसार करण्यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने २६ नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन साजरा करण्यात येतो. त्यानुसार शुक्रवारी संविधान दिनानिमित्त कराड शहर मनसेच्या वतीने संविधान प्रस्तावना प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

esahas.com

शहीद तुकाराम ओंबळे हे केडंब्याचे नव्हे तर ते देशाचे सुपुत्र : नितीन बानुगडे-पाटील

तुकाराम ओंबळे हे फक्त केडंबे गावचे नव्हे तर ते या देशाचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा शौर्याचा हा दिवस शासकीय इतमामात झाला पाहीजे. तरच येणाऱ्या पिढीमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण होईल, असे उद्गार शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी काढले.