भारतामध्ये २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले. परंतु, २६ नोव्हेंबर १९४९ रोजीच संविधान औपचारिकरीत्या स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मुल्यांचा प्रसार करण्यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने २६ नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन साजरा करण्यात येतो. त्यानुसार शुक्रवारी संविधान दिनानिमित्त कराड शहर मनसेच्या वतीने संविधान प्रस्तावना प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कराड : भारतामध्ये २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले. परंतु, २६ नोव्हेंबर १९४९ रोजीच संविधान औपचारिकरीत्या स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मुल्यांचा प्रसार करण्यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने २६ नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन साजरा करण्यात येतो. त्यानुसार शुक्रवारी संविधान दिनानिमित्त कराड शहर मनसेच्या वतीने संविधान प्रस्तावना प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, संभाजी ब्रिगेडचे कराड शहराध्यक्ष भूषण पाटील, कराड डिजिटल इन्फ्राचे मालक महेश सुळे, विनोद डुबल, संग्राम डुबल, सूर्यकांत हुलवाण, अशोक शेलार, कुमार शहा, अनिकेत चव्हाण, राजेंद्र फल्ले, घनश्याम अगरवाल, शरद मुळे उपस्थित होते.