Satara

esahas.com

भ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांच्यावर आता कारवाई...

ग्रामविकास मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय

esahas.com

स्थानिक गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; शहर पोलिसांना सापडत नसलेला संशयित गजाआड

सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोडा व खंडणीच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या अनुराग राजेंद्र पाटील (रा. गोळीबार मैदान, सातारा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तसेच शिरवळ परिसरात गावठी पिस्टल विक्रीसाठी येणार आलेल्या सौरभ सुनिल नवले, देवदत्त जयपाल कांबळे (दोघेरा.गुंडगे,ता.कर्जत,जि.रायगड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

esahas.com

विनापरवाना पुतळा लावल्याप्रकरणी एकावर कारवाई

राजवाडा परिसरातील अजिंक्य रिक्षा स्टॉप जवळ देव माणूस डॉ. अजितकुमार देव यांचा पुतळा विनापरवाना, वाहतूकीस अडथळा तसेच नागरिकांच्या जिवीतास धोका होईल अशा पद्धतीने लावल्यामुळे पोलिसांनी एकावर कारवाई केली.

esahas.com

कृषी कायदे मागे घेऊनही आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक

पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेतलेले असून संसदेत त्याबाबतचे विधेयक आणून तसा कायदेशीर निर्णय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेऊन आपल्या घरी जावे. पण तरीही आंदोलन सुरूच ठेवले जात असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

esahas.com

कराड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीसह निलंबनाची कारवाई

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यात शासनाने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ करत त्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु, एसटी कर्मचारी अद्यापही विलगीकरणाच्या मागणीवर ठाम असून त्यांनी संप मागे घेण्यास नकार दिला आहे.

esahas.com

म. फुलेंच्या शिल्पसृष्टीबाबत उदासिनता का ? : अरुण जावळे

छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे व सर्वप्रथम शिवरायांची जयंती साजरी करणारे समाजक्रांतिकारक जोतीराव फुले यांची कटगुण ही कुलभूमी आहे. त्यांच्या पत्नी अर्थात भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले यांचे यांचे नायगांव ही जन्मभूमीही याच जिल्ह्यात आहे. सातारच्यादृष्टीने या दोन्ही गोष्टी अभिमानास्पद व गौरवपूर्ण अशाच आहेत.

esahas.com

कृष्णा कॅनॉल गोवारे-हनुमाननगर रस्त्याची दुरवस्था

गोवारे गाव कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आहे. येथील ग्रामस्थ कृष्णा कॅनॉल लगतच्या रस्त्याचा वापर दळणवळणासाठी करतात. परंतु, या रस्त्याचे डांबरीकरण होऊन ८ वर्षे झाली. मात्र, सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली असून तो वाहतुकीस योग्य नाही. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. अन्यथा, बळीराजाच्या  वतीने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.  

esahas.com

जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगांचा आत्मदहनाचा इशारा

दिव्यांग बाधवांनी वेळोवेळी दिलेल्या निवेदनांची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तरीही मागण्यांची अमंलबजावनी झाली नाही, यामुळे जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग बांधव म्हणजेच  दि. ३ डिसेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय हणमंत पावर यांनी निवेदनाद्वारे दिला.

esahas.com

स. गा. म. महाविद्यालयामध्ये मतदार नावनोंदणी बोर्डाचे अनावरण

रयत शिक्षण संस्थेचे सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड, राष्ट्रीय सेवा योजना, महिला मिलिटरी, जिमखाना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना आणि निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'विशेष संक्षिप्त पुनरिक्षण' मतदार नावनोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मतदान नोंदणी संदर्भातील बोर्डाचे अनावरण करण्यात आले.

esahas.com

महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करणार : खा. शरदचंद्रजी पवार

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व लगतचे तालुक्यांमध्ये स्ट्रॅाबेरी पिकाचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. महाबळेश्वर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनाचे ठिकाण असून शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पिक आहे. देशामध्ये ४००० एकर क्षेत्रावर स्ट्रॅाबेरी पिकाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी ३००० एकर क्षेत्र हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व लगतच्या तालुक्यातील आहे.