maharashtra

कराड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीसह निलंबनाची कारवाई

सेवेत रुजू न होणाऱ्यांवर कारवाईचे संकेत : आगारातून धावली कराड-स्वारगेट पहिली बस

Suspension action with termination of service on ST employees in Karad depot
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यात शासनाने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ करत त्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु, एसटी कर्मचारी अद्यापही विलगीकरणाच्या मागणीवर ठाम असून त्यांनी संप मागे घेण्यास नकार दिला आहे.

कराड : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यात शासनाने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ करत त्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु, एसटी कर्मचारी अद्यापही विलगीकरणाच्या मागणीवर ठाम असून त्यांनी संप मागे घेण्यास नकार दिला आहे. कराडमध्येही आंदोलक कर्मचारी सदर मागणीवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे कराड आगारातील ४ कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तसेच १२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत संपामुळे राज्यातील प्रवाशी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली. तसेच त्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहनही केले आहे. मात्र, कर्मचारी अद्यापही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असून संप सुरुच ठेवला आहे. त्यामुळे कराड आगारातील ४ कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून १२ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. त्यामध्ये पाच चालक, पाच वाहक आणि दोन कार्यशाळा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच अन्य कर्मचाऱ्यांवे कारवाई होण्याआधी त्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहनही मोरे यांनी केले आहे.
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी महामंडळ प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील कायमस्वरूपी तत्त्वावरील काही कर्मचारी सोमवारी २७ रोजी कामावर हजर झाले. त्यामुळे जिल्ह्यातील विविध डेपोंतील एसटी वाहतूक काही प्रमाणात सुरू झाल्या. त्यामध्ये कराड आगारातून सोमवारी सकाळी कराड-स्वारगेट ही पहिली बस रवाना झाली.