दिव्यांग बाधवांनी वेळोवेळी दिलेल्या निवेदनांची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तरीही मागण्यांची अमंलबजावनी झाली नाही, यामुळे जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग बांधव म्हणजेच दि. ३ डिसेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय हणमंत पावर यांनी निवेदनाद्वारे दिला.
सातारा : दिव्यांग बाधवांनी वेळोवेळी दिलेल्या निवेदनांची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तरीही मागण्यांची अमंलबजावनी झाली नाही, यामुळे जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग बांधव म्हणजेच दि. ३ डिसेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय हणमंत पावर यांनी निवेदनाद्वारे दिला.
निवेदनात म्हटले आहे, वेळोवेळी दिव्यांग बाधवांनी जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मुलभूत प्रश्नांविषयी निवेदने दिली आहेत. यामध्ये २० मे २०२० रोजी दिव्यांग उपजिविकेसाठी शासकीय जमिनी बाबत, दि. १ ऑगस्ट रोजी दिव्यांगांचा समावेश अत्योदय योजनेमध्ये होणे बाबत, दि. ८ ऑगस्ट रोजी दिव्यांगाना घरकुल देणे बाबत, दि. ११ जानेवरी रोजी दिव्याग बांधवांना न्याय मिळणेबाबत, दि. १७ मार्च रोजी दिव्यांगाना शासन निर्णयानुसार समिती गठीत करण्याबाबत, दि. ४ मार्च रोजी दिव्यांगांवरील अन्याय दूर करण्याबाबत, दि. ८ जुले रोजी दिव्यांग मागणी मुद्द्यच्या प्रश्नांची सोडवणूक न होण्याबाबत, दि. १६ जुले रोजी दिव्यागांच्या विविध मागण्या संर्दभात, दि. १ नोव्हेंबर रोजी सरकारी कार्यालयात रॅम्प बसविणेबाबत अशा विविध विषयांच्या मागणी संर्दभात वारंवार पञ व्यवहार होवून सुद्धा प्रत्यक्ष अमंलबजावनी झालेली नाही, असे निदर्शनाला आले आहे.
त्यामुळे सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव जागतिक दिव्यांग दिनी म्हणजेच दि. ३ डिसेंबर रोजी रक्तदान करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आसल्याचा इशारा दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय हणमंत पावर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. रक्तदात्याना हेल्मेटचे वाटप करण्यात येणार आहे.


