Satara

esahas.com

डॉ. बाबासाहेबांच्या शाळेत संविधान दिन साजरा

ज्या श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या शाळेतील शिक्षकांनी तसेच दलित शक्ती केंद्र संर्स्थेतर्फे विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधान दिन साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाची स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही तत्वे रुजावित यासाठी माहितीपत्रकाच्या माध्यमातून संविधानाची माहितीही देण्यात आली.

esahas.com

एकरकमी एफआरपी च्या मुद्यावर बळीराजा आक्रमक

सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी ची एकरकमी पंधरा टक्के व्याजासह बिलं शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली नाही. तसेच शेतकर्‍यांना साखर कारखानदार योग्य उसदर देत नाही या मागण्यांवर वारंवार बैठका चर्चेच्या पलीकडे काहीच होत नाही. या अन्यायाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सातारा कोरेगाव मार्गावर बेमुदत रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.

esahas.com

अनुसुचित जाती जमातीची ठाकरे सरकारकडून फसवणूक

अनुसुचित जाती जमातीच्या समस्या सोडविण्यासाठी आयोगाची नियुक्ती करण्यास ठाकरे सरकारने दीड वर्षाचा विलंब केला. जनहिताच्या अनेक योजनांवर स्थगिती येऊन आयोगालाही टाळे लावण्यात आले. या आयोगाचे अस्तित्व कागदोपत्रीच ठेवून ठाकरे सरकारने अनुसुचित जाती जमातीची घोर फसवणूक केली आहे. असा घणाघाती आरोप भाजपचे माजी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

esahas.com

माझ्या पराभवासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजेच जबाबदार

मात्र हे माझ्या रक्तात नाही. पक्षाच्या चौकटीबाहेर जायचे नव्हते. भविष्यात पक्षवाढीसाठी मी काम करणार आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यातील आमदारांचे संख्याबळ का घटले? याचा विचार करावा, अशा शब्दात आ. शशिकांत शिंदे यांनी पराभवावर भाष्य केले.

esahas.com

सुपने विभागातील शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा द्या

गत काही महिन्यांपासून सुपने, पश्चिम सुपने, केसे, पाडळी, तसेच तांबवे विभागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तसेच बिबट्याने हल्ले करून अनेक पाळीव प्राणी मारले असून माणसांवरही बिबट्याने जीवघेणे हल्ले केले आहेत.

esahas.com

देशसेवेला समर्पित झालेल्या शिल्पा चिकणे यांचा अभिमान वाटतो

सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांमध्ये आपल्या जिल्ह्यातील जवानांची संख्या नेहमीच अधिक राहिली आहे. केवळ युवकच नव्हे तर, आता मुलीही सैन्यात भरती होत असून गांजे येथील शिल्पा चिकणे या युवतीने सैन्यात भरती होऊन अनोखा इतिहास घडवला आहे.

esahas.com

दुचाकीची अज्ञात वाहनाला धडक बसून युवती ठार

नांदलापूर ता. कराड गावच्या हद्दीत पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवतीचा रस्त्यावर आदळून जागीच मृत्यू झाला. तर तीन वर्षाच्या मुलीसह युवक गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी २४ रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

esahas.com

मुलीची वारंवार छेड काढणार्‍या एकास तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड

फलटण शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची वारंवार छेड काढणार्‍या संशयित रोहीत ज्ञानदेव कांबळे (रा.फलटण) याला विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

esahas.com

खिंडवाडी येथे झालेल्या खून प्रकरणी दोघांना अटक

पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरानजीक खिंडवाडी येथे झालेल्या खून प्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून संशयित व मृत हे आतेभाउ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, अद्याप खूनाचे नेमके कारण काय? हे गुलदस्त्यात असून पोलिस संशयितांकडे कसून चौकशी करत आहेत.

esahas.com

महिलेचा विनयभंग

सातारा शहरातलगत असलेल्या एका उपनगरात महिलेला भररस्त्यावर अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आदित्य सपकाळ (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.