maharashtra

वडूथ येथील घरफोडीत सुमारे तीन लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरीस


Gold and silver worth about Rs 3 lakh stolen in burglary at Vaduth
वडूथ, ता. सातारा येथे झालेल्या घरफोडीत सुमारे तीन लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरट्यांनी लांबवला असल्याची घटना घडली आहे.

सातारा : वडूथ, ता. सातारा येथे झालेल्या घरफोडीत सुमारे तीन लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरट्यांनी लांबवला असल्याची घटना घडली आहे.
वडूथ ता.सातारा येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी अनिल साहेबराव बोडके (वय 31, रा.वडूथ) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरीची घटना दि. 24 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अज्ञात चोरट्यांनी तक्रारदार यांच्या घराचे कुलुप तोडून घरातील 1 लाख 5 हजार रुपये किंमतीची 3 तोळे वजनाची सोन्याची चेन, 1 लाख 5 हजार रुपयांची 3 तोळे वजनाची सोन्याची मोहनमाळ, 35 हजार रुपये किंमतीची 1 तोळा वजनाची सोन्याची चेन, 35 हजार रुपये किंमतीची 1 तोळा वजनाची कानातील फुले, 36 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे बदाम व इतर फुले, बदाम, कानातील डुलं, रोख रक्कम असा एकूण 3 लाख 16 हजार रुपये किंमतीच्या सोन्या, चांदीच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना समोर आल्यानंतर तक्रारदार यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.