maharashtra

सातार्‍यात धूम स्टाईल चोरी; सुमारे 90 हजारांचा ऐवज लांबवला


Dhoom style theft in Satara; About 90000 were looted
सातार्‍यातील एसटी स्टॅन्ड पाठीमागे पारंगे चौकात मुंबईची प्रवासी असणार्या महिलेची पर्स धूम स्टाईलने आलेल्या बाईकर्सने चोरी केली. याप्रकरणी अर्चना श्रीरंग ढगे (वय 29, सध्या रा.दहिसर, मुंबई मूळ रा.सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सातारा : सातार्‍यातील एसटी स्टॅन्ड पाठीमागे पारंगे चौकात मुंबईची प्रवासी असणार्या महिलेची पर्स धूम स्टाईलने आलेल्या बाईकर्सने चोरी केली. याप्रकरणी अर्चना श्रीरंग ढगे (वय 29, सध्या रा.दहिसर, मुंबई मूळ रा.सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दि. 24 रोजी रात्री 9 वाजता पारंगे चौक ते एसटी स्टॅन्ड या दरम्यान ही घटना घडली आहे. तक्रारदार यांना मुंबईला जायचे असल्याने त्या ट्रॅव्हल्सनजीक गळ्यात पर्स अडकवून थांबल्या होत्या. या पर्समध्ये रोख 50 हजार 400 रुपये, 40 हजाराचा मोबाईल असा मुद्देमाल होता. दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी युवकाने जबरदस्तीने हिसका मारुन त्यांच्या गळ्यातील पर्स चोरुन नेली. या घटनेनंतर परिसरात प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. काही जणांनी दुचाकीस्वाराचा पाठलग करण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयित चोरटा अंधाराचा गैरफायदा घेवून पसार झाला.