Satara

esahas.com

निराधार, गरजूंना संदीप मुट्टल यांनी दिली मायेची ऊब

सध्या थंडीचा प्रचंड कडाका वाढला आहे. या परिस्थितीत अनेक निराधार, गोरगरीब लोक या थंडीतच रस्त्याकडेला कुडकुडत झोपलेले दिसतात. अशा गरजू लोकांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने मलकपूरचे युवानेते श्री. संदीप मुट्टल यांनी त्यांना ब्लॅंकेटचे वाटप केले. या कृतीतून त्यांनी गरजूंना एकप्रकारे मायेची ऊबच दिली आहे.

esahas.com

महामार्गावरच गुळाच्या धावत्या ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे

गोटे, ता. कराड गावच्या हद्दीत महामार्गावरच धावत्या ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाल्याची गंभीर घटना घडली आहे. रविवारी २ रोजी ६.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तालुक्यातील खोडशी गावातून गुळ भरुन कराडला जात असताना महामार्गावरच अचानकपणे ट्रॅक्टरचा पुढील भाग तुटून पडला. याचवेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने ट्रॅक्टरला धडक दिली. या विचित्र अपघातात ट्रॅक्टरचालक किरकोळ जखमी झाला आहे.

esahas.com

घुशीच्या पिंजऱ्यात सापडले उद मांजर

वारूंजी ता. कराड येथे घुस पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात उदमांजर सापडले. शुक्रवारी ३१ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गुलाबराव पाटील यांच्या घरी घुस पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात उदमांजर अडकलेले होते. याबाबतची माहिती त्यांनी तात्काळ वनविभाग व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली. त्यांनतर वनविभागाकडून सदर उदमांजर ताब्यात घेऊन सुरक्षीत स्थळी सोडण्यात आले.

esahas.com

नारळावरची कुस्ती मारायची अन हिंदकेसरी चा आव आणायचा

नारळावरील कुस्ती जिंकायची आणि हिंदकेसरी पैलवानाशी लढत दिल्याचे सांगायचे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे केविलवाणी वक्तव्य आहे. नारळावरील कुस्ती मारून राणे हिंदकेसरी पैलवानाशी बरोबरी केल्याचा आव आणत आहेत,'' अशी सडेतोड टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

esahas.com

ज्येष्ठ नागरिक पालन-पोषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

ज्येष्ठ नागरिक पालन-पोषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

४ लाख २९ हजार ७५४ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

थकबाकीदाराच्या खाजगी मिळकत क्षेत्रात सातारा पालिकेचे डांबरीकरण

सातारा पालिकेचे तब्बल सव्वा कोटी रूपये थकविणार्‍या पोवई नाक्यावरील एका बड्या व्यावसायिकाच्या मिळकत क्षेत्रातील खाजगी रस्त्याचे डांबरीकरण पालिकेने स्वखर्चाने करण्याचा प्रताप दाखविला आहे. बांधकाम विभागाने या प्रकरणावर चुप्पी साधली आहे,. काळ्या कोटाच्या दबावातून हे लांगुलचालन करण्यात आल्याची चर्चा आहे.

esahas.com

कुठे भेटले तर घेऊन या हे चमत्कारिक फुल नाही आणि असे वापरा होणारे फायदे वाचून पायाखालची जमीन सरकेल, अशे बहुगुणी फायदे !

महत्त्वपूर्ण अशा वनस्पतींची माहिती जाणून घेणार आहोत. याचे उपाय पाहणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं जीवन सुखमय आणि सुखकारक बनवाल. ती दिव्य औषधी वनस्पती आहे गोकर्ण अर्थातच अपराजिता. नावाप्रमाणेच अपराजित आहे म्हणजेच सर्व रोगांचा नाश करणारी आहे सर्व रोगांचा पराभव करणाऱ्या आहे काही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहे.

esahas.com

रेवडी येथे एकावर चाकूने वार

पालावर ठेवलेले संसारपयोगी साहित्य आणायला आलेल्या एकावर चाकूने वार केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

खून केल्याप्रकरणी एकास ६ वर्षे सक्तमजूरी

जुन्या भांडणाचा राग मनात धरुन फलटण तालुक्यातील आसू येथील एकाला गंभीर दुखापत करुन त्याचा खून करणाऱ्या युवकास सहा वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. अमोल सुतार असे शिक्षा झालेल्याचे नाव असून या खटल्याची सुनावणी पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या कोर्टात झाली.