maharashtra

जुगार अड्ड्यावर छापा


raid on gambling den
सातारा येथील भूविकास बँक चौकात एका टपरीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला.

सातारा : सातारा येथील भूविकास बँक चौकात एका टपरीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला.

याप्रकरणी कुंडलिक मल्लाप्पा मंगसुळे (वय ६३, रा. ४२६, शनिवार पेठ, सातारा) आणि चंद्रकांत शिवाप्पा अकोलकर (वय ६0, रा. ५३३, शनिवार पेठ, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. या छाप्यात ९९0 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. शाहूपुरी पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केला आहे.