महामार्गावरच गुळाच्या धावत्या ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे
कराडनजीक अपघात : ट्रॅक्टरला आयशरची पाठीमागून धडक, ट्रॅक्टरचालक जखमी
गोटे, ता. कराड गावच्या हद्दीत महामार्गावरच धावत्या ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाल्याची गंभीर घटना घडली आहे. रविवारी २ रोजी ६.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तालुक्यातील खोडशी गावातून गुळ भरुन कराडला जात असताना महामार्गावरच अचानकपणे ट्रॅक्टरचा पुढील भाग तुटून पडला. याचवेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने ट्रॅक्टरला धडक दिली. या विचित्र अपघातात ट्रॅक्टरचालक किरकोळ जखमी झाला आहे.
कराड : गोटे, ता. कराड गावच्या हद्दीत महामार्गावरच धावत्या ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाल्याची गंभीर घटना घडली आहे. रविवारी २ रोजी ६.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तालुक्यातील खोडशी गावातून गुळ भरुन कराडला जात असताना महामार्गावरच अचानकपणे ट्रॅक्टरचा पुढील भाग तुटून पडला. याचवेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने ट्रॅक्टरला धडक दिली. या विचित्र अपघातात ट्रॅक्टरचालक किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी ६.४५ वाजण्याच्या सुमारास खोडशी गावातून ट्रॅक्टर (क्र- MAN 8157) व ट्रॉली (क्र- MH 50 C 7128) चालक गुळ भरुन कराडला निघाला होता. ट्रॅक्टर पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर कराडनजीक गोटे गावच्या हद्दीत आला असता अचानकपणे ट्रॅक्टरचा पुढील भाग महामार्गावर तुटून पडला.
ही घटना घडते ना घडते तोच ट्रॅक्टरच्या पाठीच्या पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने (क्र- MH 11 AL 5626) ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात ट्रॅक्टरचालक किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात आयशर टेम्पोचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती महामार्ग पोलिसांना दिली. त्यांनतर तात्काळ महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच क्रेनच्या साहाय्याने ट्रॅकटरचे मोडून पडलेले दोन भाग महामार्गावरून बाजूला केले. त्याचबरोबर महामार्गावरील धीम्म्या गतीने सुरु असलेली वाहतूक सुरळीत केली.
यावेळी महामार्ग देखभाल विभागाचे इन्चार्ज दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, सलीम देसाई, अमीत पवार व कराड शहर पोलिस ठाण्याचे प्रशांत जाधव, खालीद इनामदार, पांडुरंग चव्हाण, दत्ता पाटील यांच्यासह खोडशी, गोटे ग्रामस्थांनी मदत केली.


