घेतलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरुन दोन महिलांनी एका महिलेला पळवून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. चैताली अशोक मते आणि योगिता पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
सातारा : घेतलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरुन दोन महिलांनी एका महिलेला पळवून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. चैताली अशोक मते आणि योगिता पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, पुजा गणेश आवडे (रा. १0६, ए विंग, रिलायबल हाईटस, विकासनगर, सातारा. मूळ रा. सातारारोड, पाडळी, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संगीता अरुण कंठे (रा. १0६, ए विंग, रिलायबल हाईटस, विकासनगर, सातारा) यांनी चैताली अशोक मते हिच्याकडून पैसे घेतले होते. मात्र, हे पैसे अजून परत दिले नव्हते. या कारणातून चैताली अशोक मते (रा. सिंहगड रोड, पुणे) आणि योगिता पवार या दोघींनी पूजा आवडे यांच्या आईला जबरदस्तीने गाडीत घालून पळवून नेले. हा प्रकार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याबाबतची तक्रार पुजा आवडे यांनी दि. १ जानेवारी रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीनतंर चैताली मते आणि योगिता पवार या दोघींवर गुन्हा दाखल झाला असून रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली नव्हती. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित यादव करत आहेत.