maharashtra

ज्येष्ठ नागरिक पालन-पोषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


One offense for violating the Senior Citizens Nutrition Act
ज्येष्ठ नागरिक पालन-पोषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : ज्येष्ठ नागरिक पालन-पोषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ डिसेंबर २०११ पासुन ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत शहनाज इब्राहीम शेख, वय ७५, रा. भवानी शाळेजवळ, गुरुवार पेठ, सातारा यांना रियाज इब्राहीम शेख, अंजु रियाज शेख दोघेही रा.भवानी शाळेजवळ, गुरुवार पेठ, सातारा यांनी वेळोवेळी वाईट शिवीगाळ करून हाताने मारहाण करून त्यांच्या मालकीच्या घरातून बाहेर काढले. तसेच त्यांचे साहित्य रस्त्यावर फेकून त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी असताना ती टाळून त्यांची देखभाल व संभाळ करत नसल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.