maharashtra

घुशीच्या पिंजऱ्यात सापडले उद मांजर


The cat was found in a cage
वारूंजी ता. कराड येथे घुस पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात उदमांजर सापडले. शुक्रवारी ३१ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गुलाबराव पाटील यांच्या घरी घुस पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात उदमांजर अडकलेले होते. याबाबतची माहिती त्यांनी तात्काळ वनविभाग व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली. त्यांनतर वनविभागाकडून सदर उदमांजर ताब्यात घेऊन सुरक्षीत स्थळी सोडण्यात आले.

कराड : वारूंजी ता. कराड येथे घुस पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात उदमांजर सापडले. शुक्रवारी ३१ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गुलाबराव पाटील यांच्या घरी घुस पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात उदमांजर अडकलेले होते. याबाबतची माहिती त्यांनी तात्काळ वनविभाग व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली. त्यांनतर वनविभागाकडून सदर उदमांजर ताब्यात घेऊन सुरक्षीत स्थळी सोडण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल तुषार नवले व वनरक्षक रमेश जाधवर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच पिंजऱ्यात अडकलेले उद मांजर त्यांनी ताब्यात घेतले.
त्यानंतर उदमांजराची येथील पशुसंवर्धन दवाखान्यात डॉ. राहुल दडस यांच्याकडे तपासणी करण्यात आली. सदर उदमांजर नर असून ते सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर उद मांजराला वनक्षेत्रपाल नवले, मानद वन्यजीव रक्षक भाटे, वनरक्षक जाधवर, उत्तम पांढरे, योगेश बेडेकर, भाऊसाहेब नलवडे यांच्या उपस्थितीत पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.