maharashtra

निराधार, गरजूंना संदीप मुट्टल यांनी दिली मायेची ऊब

ब्लॅंकेटचे वाटप : उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक

Sandeep Muttal gave warmth to the needy
सध्या थंडीचा प्रचंड कडाका वाढला आहे. या परिस्थितीत अनेक निराधार, गोरगरीब लोक या थंडीतच रस्त्याकडेला कुडकुडत झोपलेले दिसतात. अशा गरजू लोकांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने मलकपूरचे युवानेते श्री. संदीप मुट्टल यांनी त्यांना ब्लॅंकेटचे वाटप केले. या कृतीतून त्यांनी गरजूंना एकप्रकारे मायेची ऊबच दिली आहे.

कराड : सध्या थंडीचा प्रचंड कडाका वाढला आहे. या परिस्थितीत अनेक निराधार, गोरगरीब लोक या थंडीतच रस्त्याकडेला कुडकुडत झोपलेले दिसतात. अशा गरजू लोकांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने मलकपूरचे युवानेते श्री. संदीप मुट्टल यांनी त्यांना ब्लॅंकेटचे वाटप केले. या कृतीतून त्यांनी गरजूंना एकप्रकारे मायेची ऊबच दिली आहे.
संदीप मुट्टल यांना मलकापूर आणि कराड शहरातील विविध ठिकाणी महामार्गाच्या उड्डाणपूलाखाली, रस्त्याकडेला, बस स्थानक, अनेक चौका-चौकात निराधार, गोरगरीब लोक थंडीतच कुडकुडत झोपल्याचे दिसून आले. या दृष्याने त्यांच्या मनाला एकप्रकारची हुरहूर लागून आपण यांच्यासाठी काहीतरी करू शकतो का? या प्रश्नाने त्यांना बेचैन केले. त्यानंतर राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रेरणेतून आणि मित्रपरीवाराशी चर्चा केल्यानंतर त्यांनी अशा गरजू लोकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्याचा संकल्प केला.
त्यानुसार नुकतेच कराडमधील शाहू चौक, संभाजी भाजी मार्केट, बिरोबा मंदिर परिसर आणि कराड बस स्थानक परिसर, तसेच मलकापूरमध्ये दत्त मंदिर परिसर, ढेबेवाडी फाटा आदी. ठिकाणी थंडीत कुडकुडत झोपणाऱ्यांना ब्लॅंकेट वाटप केले.
यावेळी मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, संजय यादव, नगरसेवक जयंतशेठ कुराडे, विनोद शिंदे, मलकापूर शिवसेना उपशहरप्रमुख दिपक मुट्टल, कोयना वसाहतचे फिरोजभाई मुल्ला, मारुती देसाई, प्रतीक बामणे, विश्वास चौगुले, आर.पी.आयचे तालुकाध्यक्ष संतोष भिसे, मलकापूर आर.पी.आयचे शहराध्यक्ष पप्पू खिलारे, आकाश शिंदे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, निराधार, गोरगरीब, गरजू लोकांना संदीप मुट्टल यांनी ब्लॅंकेटचे वाटप करून त्यांना मायेची ऊब मिळवून दिल्याबद्धल त्यांचे सर्व स्तरातून  कौतुक होत आहे. तसेच संदीप मुट्टल यांनी दाखवलेल्या सामाजिक जाणिवेची इतरांनीही दखल घेत अशाप्रकारच्या निराधार, गोरगरीब, गरजू लोकांना विविध प्रकारे मदतीचा हात द्यावा, असे मतही अनेक जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.