४ लाख २९ हजार ७५४ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : ४ लाख २९ हजार ७५४ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १ जानेवारी २०२० ते दि. ३१ डिसेंबर दहा वाजण्याच्या सुमारास सातारा येथील शनिवार पेठेत असणाऱ्या वाघाच्या नळीजवळ असणाऱ्या राज ग्लास सप्लायर्स नावाच्या स्क्रॅपच्या दुकानातुन सुरेश श्रवण सूर्यवंशी, वय २१, रा. चिमणपुरा पेठ, सातारा याने वसंत लक्ष्मण शालगर, रा. श्रीराम अपार्टमेंट, शनिवार पेठ, सातारा यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या मालकीच्या ४ लाख २९ हजार ७५४ रुपये कमतीचा ३६० सेंट्रींगच्या प्लेटा एका महिन्याचे भाडे लिहून मुदत संपल्यानंतर अद्यापपर्यंत परत न देता आर्थिक फसवणुक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


