Satara

esahas.com

ओगलेवाडीत बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी युवकास अटक

ओगलेवाडी, ता. कराड येथे बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगणार्‍या युवकास पोलिसांनी अटक केले. बुधवार दि. ५ रोजी दुपारी ओगलेवाडी चौक येथील भाजी मंडई परिसरात कारवाई करण्यात आली. मुबिन युन्नुस पटेल (वय 26) रा. हजारमाची ता. कराड असे बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

esahas.com

38 हजार रुपये किमतीच्या तीन लोखंडी केसिंगची चोरी

येथील विकास नगर परिसरातुन अज्ञात चोरट्याने 38 हजार रुपये किमतीच्या तीन लोखंडी केसिंगची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

सातारा तालुक्यात दोन दुचाकींची चोरी

सातारा तालुक्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

esahas.com

बिबट्याचा शेळीवर हल्ला

पाटण तालुक्यातील त्रिपुडी येथे मध्यरात्री लक्ष्मण धोंडीबा देसाई यांच्या घरातील गोठ्यात शेळीवर रात्री १२ वाजता बिबट्याने हल्ला केल्याने शेळी जागीच ठार झाली आहे. शेळीचा धडपडण्याचा आवाज येताच आरडाओरडा केल्याने बिबट्या पसार झाला. मात्र, तोपर्यंत शेळी जागीच ठार झाली होती.

esahas.com

जिल्ह्यात घडलेल्या वेगवेगळ्या अपघातात पाचजण जखमी

जिल्ह्यात पाचठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत.

esahas.com

श्री यमाई देवी यात्रेतील छबिना, दीपोत्सव, रथोत्सव रद्द

औंध, ता. खटाव येथील श्री यमाई देवीच्या यात्रेनिमित्ताने काढण्यात येणारा छबिना, दीपोत्सव, रथोत्सव यावर्षी आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी दिली.

esahas.com

पाल येथील यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल

पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा देवाची यात्रा दि. 14 जानेवारी ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत संपन्न होणार असून कोरोना आणि ओमायक्रान च्या अनुषंगाने ही यात्रा प्रशासनाच्या नियमावलीनुसार साजरी करण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त पोलीस अधिक्षक अजय बंसल यांच्या सूचनेवरून वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

esahas.com

नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे

ज्या नागरिकांनी अद्याप कोरोना 19 प्रतिबंधक लसीकरण केलेले नाही त्यांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

esahas.com

मौजेमळा, कोळणे पाथरपुंज ग्रामस्थांचे 11 पासून असहकार आंदोलन

मौजेमळा, कोळणे व पाथरपुंज येथील 325 खातेदारांचे पुनर्वसनं गेल्या छत्तीस वर्षापासून चांदोली अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमुळे करण्यात आलेले नाही. राज्य शासनाने हा प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा आम्ही या क्षेत्रातील वन विभागाच्या कार्यालयाला टाळेठोक करून असहकार आंदोलनं करू, असा इशारा पुनर्वसन कृती संघर्ष समितीचे समन्वयक संजय यशवंत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

esahas.com

वनभवन येथे शिवसैनिकांचे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन

२०१८ ते २०२१ या कालावधीमध्ये सातारा तालुका वन विभागातील वनरक्षकका पासुन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा केला आहे. त्याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागवली असता ती अपूर्ण स्वरूपात दिली जात असल्याच्या निषेधार्थ शिवसेना सातारा विधानसभा यांच्यावतीने आज सातारा येथील वनभवन येथे गांधीगिरी आंदोलन करत अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प दिले.