सातारा तालुक्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
सातारा : सातारा तालुक्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी सव्वा दहा ते सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास निगडी तर्फ सातारा, ता. सातारा येथील सुतारकी नावाच्या शिवारातून अज्ञात चोरट्याने 25 हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एम.एच. 11 एआर 6623 अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार रानोजी निवृत्ती भिसे, वय 39, रा. निगडी तर्फ सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दुसर्या घटनेत दि. 27 ऑक्टोंबर 2021 रोजी कोडोली, ता. सातारा येथील तुकाराम नगर परिसरातुन राहत्या घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच. 11 सीव्ही 7727 अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सत्यम जयवंत वाघ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.


