जिल्ह्यात पाचठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत.
सातारा : जिल्ह्यात पाचठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत.
धनाजी आनंदराव चिकणे, वय 70, रा. धोंडेवाडी, ता. सातारा यांना सातारा- रहिमतपुर मार्गावर धोंडेवाडी गावच्या हद्दीत समोरून येणार्या ओमीनी कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर प्रथम सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसर्या घटनेत अजय विलास भिसे, वय 21, रा. सम्राट नगर, शाहुपुरी, सातारा हा वाढे फाटा येथून सातारा कडे दुचाकीवरून येत असताना समोरून आलेल्या दुसर्या अज्ञात दुचाकीने त्याच्या दुचाकीला डॅश दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिसर्या घटनेत आकाश अंकुश काळे वय 30, ( पेशंटला पत्ता सांगता येत नाही) हा मोगराळे घाट, ता. फलटण येथे झालेल्या अपघातात जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चौथ्या घटनेत गणेश महादेव भंडलकर, वय 24, रा. बुरुड गल्ली, कोरेगाव, ता. कोरेगाव याचा सातारा - पुसेगाव मार्गावर गोळेगाडी गावच्या हद्दीत हॉटेल दरबार समोर अपघात झाल्याने त्यात तो जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाचव्या घटनेत अविष्कार नवनाथ पवार, वय 18, रा. मल्हार हाऊसिंग सोसायटी, सदरबझार, सातारा हा लिंब खिंड हद्दीत असणार्या डीमार्ट जवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


