औंध, ता. खटाव येथील श्री यमाई देवीच्या यात्रेनिमित्ताने काढण्यात येणारा छबिना, दीपोत्सव, रथोत्सव यावर्षी आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी दिली.
सातारा : औंध, ता. खटाव येथील श्री यमाई देवीच्या यात्रेनिमित्ताने काढण्यात येणारा छबिना, दीपोत्सव, रथोत्सव यावर्षी आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी दिली.
बंसल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, दि. 16 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2022 या कालावधीत औंध येथील श्री यमाई देवीची यात्रा होणार आहे. यात्रेचा मुख्य दिवस दि. 17 जानेवारी असा असून यात्रेच्या निमित्ताने छबिना, दिपोत्सव, रथोत्सव यावर्षी आयोजित केला जाणार नाही. दरम्यान भाविकांनी वाहनांच्या वाहतुकीचे नियमन, तसेच मिरवणुकीच्या मार्गात संबंधाने व मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे, ध्वनि प्रदूषण याबाबत सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करावे. लाऊड स्पीकर चा वापर योग्य प्रकारे करावा याकरता निर्बंध घालणे आवश्यक आहे.