maharashtra

नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे

जिल्हाधिकारी शेखरसिंह यांचे कळकळीचे आवाहन

Citizens should be vaccinated immediately
ज्या नागरिकांनी अद्याप कोरोना 19 प्रतिबंधक लसीकरण केलेले नाही त्यांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

सातारा : ज्या नागरिकांनी अद्याप कोरोना 19 प्रतिबंधक लसीकरण केलेले नाही त्यांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
राज्यात कोरोना 19 चा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत सातारा जिल्ह्यात देखील करोना १९ चे रुग्ण वाढू लागले आहेत. सध्या सहा ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत असे सिंह यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, नागरिकांनी योग्य पद्धतीने मास्क वापरले पाहिजेत. चेहरा आणि नाक झाकले गेले पाहिजे अशा प्रकारे मास्क वापरा. फॅन्सी मास्क वापरणे टाळा. ओमिक्रॉनचा संसर्ग पसरण्याचा वेग जादा आहे. एका कुटुंबातील व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली तर सर्वांनाच बाधा होतेय हे समजून घ्या.
ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे, असेही जिल्हाधिकारी सिंह यांनी नमूद केले. त्यामुळे ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे. ज्यांनी लसीचा दूसरा डोस घेतलेला नाही त्यांनी तातडीने घ्यावा. जिल्ह्यात दीड लाख मुले आहेत. त्यांचे लसीकरण आपण करणार आहोत. आत्तापर्यंत २५ हजार मुलांचे लसीकरण झालेले आहे.
शाळा आणि महाविद्यालयांत आम्ही लसीकरणाची माेहिम राबविणार आहोत. १८ ते ४४ वयोगटातील ज्यांनी लस घेतलेली नाही, तेच नागरिक जगभरात आयसीयूत असल्याचा दाखला जिल्हाधिकारी सिंह यांनी दिला.