maharashtra

ओगलेवाडीत बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी युवकास अटक


Youth arrested for carrying pistol in Oglewadi
ओगलेवाडी, ता. कराड येथे बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगणार्‍या युवकास पोलिसांनी अटक केले. बुधवार दि. ५ रोजी दुपारी ओगलेवाडी चौक येथील भाजी मंडई परिसरात कारवाई करण्यात आली. मुबिन युन्नुस पटेल (वय 26) रा. हजारमाची ता. कराड असे बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

कराड : ओगलेवाडी, ता. कराड येथे बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगणार्‍या युवकास पोलिसांनी अटक केले. बुधवार दि. ५ रोजी दुपारी ओगलेवाडी चौक येथील भाजी मंडई परिसरात कारवाई करण्यात आली. मुबिन युन्नुस पटेल (वय 26) रा. हजारमाची ता. कराड असे बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्याकडून जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना बेकायदा शस्त्र बाळगणार्‍यांवर कारवाई करण्याची सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी अधिकार्‍यांना कारवाई करण्याची सुचना केली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांना बुधवारी 5 रोजी मुबिन पटेल याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विजय गोडसे यांच्यासह उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस नाईक बाबुराव यादव, पोलीस नाईक राजश्री शिंदे, कॉन्स्टेबल धिरज कोरडे, सागर चव्हाण यांनी ओगलेवाडी चौकात थांबलेल्या मुबिन पटेल याच्याकडून 90 हजार रुपये किमतीची पिस्तुल हस्तगत करुन त्याला अटक केली.
याबाबतची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, शहर व परिसरात अवैधरित्या पिस्तुल बाळगणार्‍यांची माहीती असल्यास याबाबतची माहिती पोलिसांना कळवावी, असे आवाहनही शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.