Satara

esahas.com

सभापतींच्या गावात सर्वसामान्यांवर होतोय अन्याय

सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांच्या गावात त्यांच्याच विचारांची ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीमध्ये सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक यांनी अधिकाराचा गैरवापर करुन चुकीच्या ठरावाने घराची नोंद केली आहे. सभापतींचे पती संभाजी इंदलकर हे म्हणतात की दोन्ही महाराज हे माझ्या खिशात आहेत. काहीच कोणी करु शकत नाहीत, याची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे बजरंग श्रावण अंबुले यांनी केली आहे.

esahas.com

क्रीडा संकुलांचा निधी वेळेत खर्च करा : पालकमंत्री

राज्य शासनाकडून जिल्हा व तालुकास्तरावरील क्रीडा संकुलांना निधी मिळाला आहे. तो वेळेत खर्च करावा. मैदान नसणार्‍या तालुक्यांनी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना सहकारमंत्री व पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या. दरम्यान, श्री. सौ. वृषालीराजे भोसले यांनी फुटबॉल मैदानासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली.

esahas.com

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर दोन गटात जोरदार हाणामारी

येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर दोन गटामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सातारा शहरात एकच खळबळ उडाली. यावेळी काही युवकांनी त्या ठिकाणी असणाऱ्या पायल लेडीज शॉपवर दगडफेक करून पलायन केल्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

esahas.com

सातारा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाला मारहाण करून टाकले चुन्याच्या निवळीत

येथील रविवार पेठेत असणाऱ्या लोणार गल्लीतील  स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या एका युवकाला चुन्याच्या निवळीत टाकल्याने त्याच्या हाताला गंभीर इजा झाली. समाधान महादेव मुळीक वय २९, रा. रविवार पेठ, सातारा असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

esahas.com

सातारा येथे घरफोडी करून रोख रकमेसह दागिन्यांची चोरी

येथील गोळी मैदान परिसरात असणाऱ्या पायरी पार्कमधील एका घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

आसले येथे गळफास लावून एकाची आत्महत्या

आसले, ता. वाई तेथील एकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद  भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासह एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासह एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तेजस सोनवणे रा. कोडोली, सातारा असे त्याचे नाव आहे. (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही)

esahas.com

सातारा येथे महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

येथील सदरबझार परिसरात वास्तव्य करत असणाऱ्या एका महिलेला मला ४० ते ५० हजार रुपये दे असे म्हणत तिला शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी संदीप विनायक भोसले रा. जवान हौसिंग सोसायटी लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

खोकडवाडी गावच्या हद्दीत अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

खोकडवाडी, (कोडोली) ता. सातारा गावच्या हद्दीत अज्ञात दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

सातारा पालिकेच्या पॉवर हाऊस येथे वीस मेगावॅटचे उपकेंद्र मंजूर

खासदार उदयनराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून सातारा नगरपालिकेच्या पॉवर हाउस येथील जागेमध्ये वीस मेगावॅट वीज निर्मितीचे उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी महावितरणच्या माध्यमातून पाच कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कामाची लवकरच सुरुवात होणार असून या उपकेंद्रामुळे सातारा शहर आणि लगतचा ग्रामीण परिसर लोडशेडिंग मुक्त होण्यास मदत होणार आहे.