येथील सदरबझार परिसरात वास्तव्य करत असणाऱ्या एका महिलेला मला ४० ते ५० हजार रुपये दे असे म्हणत तिला शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी संदीप विनायक भोसले रा. जवान हौसिंग सोसायटी लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : येथील सदरबझार परिसरात वास्तव्य करत असणाऱ्या एका महिलेला मला ४० ते ५० हजार रुपये दे असे म्हणत तिला शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी संदीप विनायक भोसले रा. जवान हौसिंग सोसायटी लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ फेब्रुवारी रोजी पाच वाजण्याच्या सुमारास संदीप विनायक भोसले रा. जवान हौसिंग सोसायटी लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा हा तेथीलच गायत्री विलास भोसले वय ६५ यांच्या घरी मद्यप्राशन करून आला. तू मला जेवायला वाढ, मला पुण्याला जायचे आहे. मला ४० ते ५० हजार रुपये दे असे म्हणत तिला शिवीगाळ, मारहाण केली. यापूर्वीही त्याने गायत्री भोसले यांना त्यांच्या नावावर असलेले घर प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून देण्यासाठी भांडणे केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


