maharashtra

खोकडवाडी गावच्या हद्दीत अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


One person was injured in an accident in Khokadwadi village
खोकडवाडी, (कोडोली) ता. सातारा गावच्या हद्दीत अज्ञात दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : खोकडवाडी, (कोडोली) ता. सातारा गावच्या हद्दीत अज्ञात दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ५  फेब्रुवारी रोजी ८. ३० वाजण्याच्या सुमारास खोकडवाडी, (कोडोली) ता. सातारा गावच्या हद्दीत
सातारा - रहिमतपूर मार्गावर संतोष तुकाराम किर्तत वय ४६, रा. दौलतनगर, करंजे तर्फ सातारा हे दुचाकी क्रमांक एमएच २१ सी एच ४२६१ वरुन खोकडवाडी, (कोडोली)  येथून आपल्या घरी परतत असताना दुसरा अज्ञात  इसम दुचाकी क्रमांक एमएच ०४- ६३३७ वरून भरधाव वेगाने येऊन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून संतोष किर्दत यांच्या दुचाकीला समोरून धडक देऊन त्यांच्या दुखापतीला कारणीभूत झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.