अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासह एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तेजस सोनवणे रा. कोडोली, सातारा असे त्याचे नाव आहे. (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही)
सातारा : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासह एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तेजस सोनवणे रा. कोडोली, सातारा असे त्याचे नाव आहे. (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही)
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातील एका उपनगरात वास्तव्य करीत असलेली एका अल्पवयीन मुलगी सातारा शहरातील एका नामवंत शाळेतून आपल्या घरी रिक्षातून येत असताना त्याच रिक्षात बसून तेजस सोनवणे हा तिच्याशी जवळीक साधण्याचा या हेतूने गेल्या महिनाभरापासून तिचा वारंवार पाठलाग करीत होता. तिच्या आईच्या मोबाइल व्हाट्सअपवर त्या मुलीला चारभिंती येथे भेटण्यासाठी ये असा मेसेज करत होता. तदनंतर तु मला आवडतेस माझ तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून तिच्याशी जवळीक साधण्याच्या हेतूने तो वारंवार पाठलाग करीत असल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.


