येथील गोळी मैदान परिसरात असणाऱ्या पायरी पार्कमधील एका घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील गोळी मैदान परिसरात असणाऱ्या पायरी पार्कमधील एका घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ फेब्रुवारी २०२२ ते दि. ९ फेब्रुवारी दरम्यान नजीर सरदार मुलाणी यांच्या घराचे लोखंडी शटरचे कुलूप व लाकडी दरवाज्याचे सेफ्टी लॉक तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.


