येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर दोन गटामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सातारा शहरात एकच खळबळ उडाली. यावेळी काही युवकांनी त्या ठिकाणी असणाऱ्या पायल लेडीज शॉपवर दगडफेक करून पलायन केल्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सातारा : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर दोन गटामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सातारा शहरात एकच खळबळ उडाली. यावेळी काही युवकांनी त्या ठिकाणी असणाऱ्या पायल लेडीज शॉपवर दगडफेक करून पलायन केल्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज सकाळच्या सुमारास सदरबझार परिसरात असणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर अचानक दोन गट एकमेकांच्या समोर आले. त्यामध्ये सहभागी असलेल्या काही युवकांकडे शस्त्रे असल्याचे सांगितले जात होते. दोन गटात अचानक वाट होऊन त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले. त्यातील एक युवक परिसरात असणाऱ्या पायल लेडीज शॉपीमध्ये पळत गेल्यानंतर दुसऱ्या काही युवकांनी शॉपीच्या काचेवर दगडफेक केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान दोन्ही गटातील युवकांनी घटनास्थळावरून पलायन केले असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.