twogroupsclashedinfrontofyashwantraochavancollege

esahas.com

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर दोन गटात जोरदार हाणामारी

येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर दोन गटामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सातारा शहरात एकच खळबळ उडाली. यावेळी काही युवकांनी त्या ठिकाणी असणाऱ्या पायल लेडीज शॉपवर दगडफेक करून पलायन केल्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.