Satara

esahas.com

सातारा तालुक्यात दोघांची आत्महत्या

सातारा तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये दोघांनी आत्महत्या केल्या.

esahas.com

पुसेगाव येथे बैल बिथरून बैलगाडी प्रेक्षकात आल्याने एक जखमी

पुसेगाव, ता. खटाव येथे बैलगाडी शर्यती दरम्यान बैल बिथरून बैलगाडी प्रेक्षकात आल्याने झालेल्या दुर्घटनेत एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

esahas.com

अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सावत्र बापाला सक्तमजुरी

अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सावत्र बापाला पॉक्सो अंतर्गत न्यायालयाने १० वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक वर्ष साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

esahas.com

विवाह करण्याच्या उद्देशाने युवतीला पळवून नेल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हे

विवाह करण्याच्या उद्देशाने एका युवतीला देवाची आळंदी येथे पळवून नेल्याप्रकरणी चार जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

सातत्याने माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून, दारू पिऊन येऊन शिवीगाळ करून पत्नीचा छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

हरिहरेश्वर बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली

हरिहरेश्वर बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून बनावट कर्ज प्रकरण दाखवून ४ कोटी ४९ लाख रुपयांचा गैरव्यवहार आणखी एक गुन्हा अजित खामकर, नंदकुमार खामकर यांच्यासह १८ जणांवर दाखल झाला आहे.

esahas.com

फोटो व्हायरल करून प्रेयसीची प्रियकराने केली बदनामी; गुन्हा दाखल

शहरातील एका भागात राहत असलेल्या युवतीने प्रेम संबंध असणाऱ्या तिच्या प्रियकरासोबत फोटो काढले होते. काही दिवसांनी प्रेयसीने प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून तिचे हे फोटो मित्र व नातेवाईकांना पाठवून युवतीची बदनामी केल्याने त्याच्याविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

शिरवळ येथील खूनप्रकरणी भाजपच्या माथाडी कामगार नेत्याला अटक

शिरवळ, ता. खंडाळा येथे बिबेवाडी, पुणे येथील एकाचा डोक्यात गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या माथाडी कामगार नेत्याला शिरवळ पोलिसांनी आज पुणे येथे अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शिरवळ पोलिसांनी यापूर्वीच या खून प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणातील अटकेतील संशयितांची संख्या सातवर पोहोचली आहे.

esahas.com

सातारा येथे अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

येथील संगम नगर परिसरात एका मंगल कार्यालयात पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला. दरम्यान दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात त्यांना देण्यात आले.

esahas.com

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक यांचे निधन

शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख व कराडचे नगरपालिकेचे माजी नगरसेवक रामभाऊ रैनाक (वय 62) यांचे सोमवारी २२ रोजी रात्री उशिरा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कराड शहरासह जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.