maharashtra

विवाह करण्याच्या उद्देशाने युवतीला पळवून नेल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हे


Four persons have been booked for kidnapping a young woman for the purpose of marriage
विवाह करण्याच्या उद्देशाने एका युवतीला देवाची आळंदी येथे पळवून नेल्याप्रकरणी चार जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : विवाह करण्याच्या उद्देशाने एका युवतीला देवाची आळंदी येथे पळवून नेल्याप्रकरणी चार जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात वास्तव्य करणारी एक युवती औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करते.  दि. १९ फेब्रुवारी ते दि. २० फेब्रुवारी २०२२ दरम्यान संबंधित कंपनीच्या जवळ रस्त्यावर, देगाव फाटा आणि देवाची आळंदी येथून शुभम नवनाथ बरकडे, वय २१, रा. लिंब, ता. सातारा याने तिला समक्ष व फोनवरून तु मला सोडून गेलीस अथवा तु माझ्याशी विवाह केला नाहीतर तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करून घेईन, अशी धमकी दिली.
दरम्यान मंगेश खंडझोडे, गौरव बरकडे दोन्ही रा.  लिंब व अनोळखी इसमाने तिला दुचाकीवर बसवून देहु आळंदी, जि. पुणे या ठिकाणी नेहून शुभम नवनाथ बरकडे याने तिच्याशी जबरदस्तीने हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे विवाह केल्याची तक्रार संबंधित युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. संबंधित चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.