maharashtra

पुसेगाव येथे बैल बिथरून बैलगाडी प्रेक्षकात आल्याने एक जखमी


One injured when a bullock cart overturned in public
पुसेगाव, ता. खटाव येथे बैलगाडी शर्यती दरम्यान बैल बिथरून बैलगाडी प्रेक्षकात आल्याने झालेल्या दुर्घटनेत एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

सातारा : पुसेगाव, ता. खटाव येथे बैलगाडी शर्यती दरम्यान बैल बिथरून बैलगाडी प्रेक्षकात आल्याने झालेल्या दुर्घटनेत एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिकंदर हैदर शेख, वय ३५, रा. जुनीपेठ, वडाच्या झाडाजवळ, कठापुर रोड, कोरेगाव हा पुसेगाव येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी गेला होता. शर्यती दरम्यान बैल बिथरून बैलगाडी प्रेक्षकात आल्याने झालेल्या दुर्घटनेत तो जखमी झाल्याने त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.