maharashtra

सातारा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात चौघे जखमी


Four injured in two separate accidents in Satara taluka
सातारा तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत.

सातारा : सातारा तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अर्जुन रघुनाथ चव्हाण, वय 24, रा. सोनवडी, ता. सातारा हा मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बजाज पल्सर क्रमांक एम. एच. 12 बीएच 9464 वरून जात असताना गजवडी गावच्या हद्दीत फाट्याजवळ बजाज पल्सरने एक्टिवा क्रमांक एम. एच. सीइ 7192 ला पल्सरने धडक दिल्याने त्याच्यासह शिवाजी तात्या शिरटावले त्यांची पत्नी कलावती शिवाजी शिरटावले वय 62 दोघेही रा. खडगाव, ता. सातारा हे जखमी झाले. त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी शिवाजीशी शिरटावले यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना सातारा येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दुसर्‍या घटनेत विजय चंद्रकांत वाघ, रा वेळु, ता. कोरेगाव हे दुचाकीवरून जात असताना कोडोली येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.