पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर रहीमतपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर रहीमतपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ सप्टेंबर २०२० ते दि. १४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत सुरज बाळु पवार, वय २३, मुळ रा. गोरेगाव वांगी, ता. खटाव सध्या रा. रहिमतपुर, ता. कोरेगाव याने पत्नी सुहानी हिला वारंवार हाताने मारहाण केली. या मारहाणीत तिच्या पोटामध्ये गाठ आली. तिला असह्य वेदना होत होत्या. पती सुरज याने केलेल्या मारहाणीला कंटाळूनच तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार सुहानी हिचे वडील अण्णा किसन फडतरे, रा. लक्ष्मी नगर कोरेगाव यांनी रहीमतपुर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. सुरज पवार याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.


