सातत्याने माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून, दारू पिऊन येऊन शिवीगाळ करून पत्नीचा छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातत्याने माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून, दारू पिऊन येऊन शिवीगाळ करून पत्नीचा छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुलै २०१५ ते दि. २१ फेब्रुवारी २०२२ दरम्यान वैशाली निवास, जय मल्हार हौसिंग सोसायटी, सदरबझार, सातारा आणि आकांक्षा कॉर्नर, सोमवार पेठ, सातारा येथे पोर्णिमा दिगंबर ढावरे, वय ३२ या विवाहित महिलेला पती दिगंबर सदाशिव ढावरे, वय ४०, रा. जय मल्हार हौसिंग सोसायटी, सदरबझार, सातारा याने माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून दारू पिऊन ठेवून शिवीगाळ करून तिचा छळ केला. तसेच तू तुझ्या घरच्या लोकांच्या बरोबर बोलायचे नाही असे म्हणत तिचा मोबाइल फोडून तुझ्या घरच्यांना माझ्या घरी येऊन द्यायचे नाही, अशी धमकी दिल्याची तक्रार पोर्णिमा ढावरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पती दिगंबर ढावरे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


