शहरातील एका भागात राहत असलेल्या युवतीने प्रेम संबंध असणाऱ्या तिच्या प्रियकरासोबत फोटो काढले होते. काही दिवसांनी प्रेयसीने प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून तिचे हे फोटो मित्र व नातेवाईकांना पाठवून युवतीची बदनामी केल्याने त्याच्याविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : शहरातील एका भागात राहत असलेल्या युवतीने प्रेम संबंध असणाऱ्या तिच्या प्रियकरासोबत फोटो काढले होते. काही दिवसांनी प्रेयसीने प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून तिचे हे फोटो मित्र व नातेवाईकांना पाठवून युवतीची बदनामी केल्याने त्याच्याविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आकाश दिलीप शिर्के, वय २२ रा. नांदलापूर ता. कराड असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित युवती दुसऱ्या तालुक्यात शिक्षण घेत होती. यावेळी तिची ओळख आकाश शिर्के याच्याशी झाली. या ओळखीतून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवसांनी दोघांनी काही फोटो काढले. हे फोटो आकाश याने स्वत: जवळ ठेवले. युवती आणि त्यांच्या प्रेम संबंधाची माहिती तिच्या कुटुंबाला कळताच त्यांनी विरोध केला. हा विरोध होताच युवतीने त्यांच्याशी बोलणे बंद करून प्रेम संबंध ठेवण्यात नकार दिला. याचा राग मनात धरून आकाश याने हे फोटो तिच्या नातेवाईक व मित्र-मैत्रिणीला पाठवले. तसेच इन्स्ट्राग्रामवर फेक अकाऊंट काढून हे फोटो पोस्ट केले. याची माहिती युवतीला मिळाताच तिने शाहूपुरी पोलीस ठाण्यात जावून आकाश यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत.


