सातारा तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये दोघांनी आत्महत्या केल्या.
सातारा : सातारा तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये दोघांनी आत्महत्या केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रकाश चंद्रकांत बनपट्टे, वय २३, रा. केसरकर पेठ, सातारा याने मंगळवारी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत दि. २२ रोजी ४ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास म्हसवे, ता. सातारा येथील लमान वस्तीमध्ये तेथीलच अनिल विठ्ठल शेलार, वय २५ याने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.


