सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवारी महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली. शिव आराधना, रुद्रपठण, जलाभिषेक अशा पारंपारिक विधीद्वारे भाविकांनी शंभू महादेवाची आराधना केली. जिल्ह्यात सर्वत्र प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनांसाठी गर्दी केली होती.
लटणमधील उद्योजक दिगंबर आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्जाद्वारे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप करीत त्यांच्यासह कारखाना व पतसंस्था संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटणमध्ये पत्रकार परिषद घेत आगवणेंच्या आरोपांचे खंडण करीत आगवणे हेच मिस्टर नटवरलाल असून आगवणेंना जे मदत करीत असतील, त्यांना त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील, असा सज्जड इशाराही खा. नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांना आडमुठे पणा आणि परावलंबी धोरणाचे परिणाम आताचे घडीला संपूर्ण युक्रेन ला भोगायला लागत आहे. चर्चेतून सुटू शकणाऱ्या बाबीसाठी आज महायुद्ध सुरु झाले आहे. भारत स्वतंत्र काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना हल्ले करत होते परंतु पाश्चिमात्य देश जपान हल्ले करत आहे अश्या बातम्या पेरत होते तसेच सद्यस्थितीला मीडिया तसेच सर्वत्र युक्रेनच्या पराक्रमाच्या बातम्या येत असल्या तरी वास्तवामध्ये रशियाने आतापर्यंत केलेले हल्ले आणि त्यातून युक्रेनचे झालेले नुकसान भरून यायला युक्रेनला कमीतकमी २० वर्षाचा कालावधी लागेल असे तज्ञांचे मत असून हे युद्ध असेच सुरु राहिले तर युक्रेन सारखा देश स्वतःचे नामोनिशाण गमवालेशिवाय राहणार नाही.
ठाणे, पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याच्या बातम्या येत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. मात्र, आपल्या सातारा जिल्ह्यात अशा प्रकारे कोणत्याही तालुक्यात बर्ड फ्लूचा कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अकुंश परिहार यांनी केले आहे.
शाहूपुरी भागातील जुन्या ग्राहकांना नवीन कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून कनेक्शन शिफ्टिंग करुन देत असतानाच ज्या नागरिकांना नवीन कनेक्शन हवे आहे. त्यांना ती त्वरीत देण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेच्या उद्रेकास सामोरे जावे लागेल असा इशारा शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनास दिला. यावेळी अधिकाऱ्यांनी नवीन ग्राहकांना कनेक्शन देण्याबाबत आघाडीने मांडलेल्या मुद्यांशी प्राधिकरण सहमत असून याप्रश्नी आगामी काळात तातडीने निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
तब्बल 480 किलोमीटर दुचाकीवरुन अवघ्या सतरा तासांत प्रवास करुन अष्टविनायक दर्शन घेण्याचा विक्रम लोणंदमधील प्राजक्ता घोडके हिने केला आहे. या दरम्यान तिने ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा संदेश देत मुलींपुढे आदर्श प्रस्थापित केला असून अशा प्रकारे बुलेट रायडिंग करणारी ती महाराष्ट्रातील पहिली मुलगी ठरली असून तिच्या उपक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने घेतली आहे.
गेली चार महिने विना वेतन असूनही वडूज एसटी आगारात एसटी कर्मचारी नेटाने राज्य सरकारमध्ये कर्मचाऱ्यांचे विलनीकरणाच्या मागणीसाठी ठाम आहेत. त्यांना पाठिंबा व मदतीचा हात देण्यासाठी येरळवाडी, ता. खटाव येथील एस. टी. कर्मचारी गोरखनाथ चव्हाण यांचे सुपुत्र युवा नेते धनंजय चव्हाण यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला असून मदतीचा हात म्हणून त्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
दुष्काळी भागात वैभवशाली वास्तू उभ्या राहत आहेत. येथील मुले हुषार असून शैक्षणिक मेहनतीने देशाच्या कानाकोपऱ्यात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून सेवा बजावत आहे. तर काही जण सोन्याच्या दलाईचे काम करीत आहेत, असे प्रतिपादन माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
गोळीबार मैदान परिसरात राहणाऱ्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीने आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
कराड तालुक्यातील तळबीड बेलवडे हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा लेन वर आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडीचा अपघात झाला. यामध्ये दोनजण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.