दुचाकी निष्काळजीपणाने चालवून स्वतःच्या मृत्यूस व अन्य एकास जखमी केल्याप्रकरणी रुजाय पिंटो, वय ६०, रा. टिळकवाडी (बेळगाव), कर्नाटक यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चव्हाणवाडी, ता.पाटण येथे एका अज्ञाताने शेतातील बांध जाळण्यासाठी लावलेल्या आगीत १३ गवताच्या गंजी जळून खाक झाल्या. तसेच बाजूला असलेल्या छप्पराला आग लागून त्यात असणाऱ्या म्हशीचाही भाजून मृत्यू झाला. यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल दोन लाखांचे नुकसान झाले.
तलाठी किरण तानाजी पवार यांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच पवार यांना मारहाण करुन शासकिय कामात अडथळा करणाऱ्या तसेच त्यांना धमकी दिल्याबद्दल तानाजी खाशाबा वलेकर (वय 38) व सचिन दादा राजगे (वय 35, दोघे रा. पिंपरी ता. माण) या दोघांना अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश पी. वाय काळे यांनी दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत साधी कैद व प्रत्येकी 20 हजार रुपये दंड व दंड न भरलेस दोन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
सुरूर, ता. वाई येथूनदोन ट्रकच्या डिझेल टाकीमधुन एकाने डिझेलची चोरी केल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
फडतरवाडी, ता. सातारा येथे विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
कळंबी, ता. खटाव येथे शेताच्या वादावरून एकाला मारहाण झाल्याची घटना घडली.
पतीने मारहाण केल्याने पत्नी जखमी झाल्याची घटना येथील व्यंकटपुरा येथे घडली.
सातारा जिल्हा पुर्व प्राथमिक शिक्षिका, सेविका संघाने आपल्या विविध मागण्यांसाठी येथील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर मोर्चा काढुन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना निवेदन सादर केले.
सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या क्षेत्रासाठी 48 कोटी रुपयांचा आराखडा नगर विकास विभागाने मंजूर केला असून या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. या निधीचा पहिला टप्पा लवकरच नगरपालिकेला प्राप्त होणार असल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
किसन वीर यांनी उभारलेला आणि सध्या आर्थिक अडचणीमुळे बंद असलेला साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे कामगारांचे हित जपण्यासाठी सुरु होणे गरजेचे आहे. पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या, सभासदांच्या सातत्याने होणाऱ्या मागणीचा विचार करून सर्वांच्या सहकार्याने किसनवीर सातारा साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्णय आमदार मकरंद पाटील यांनी जाहीर केला.