maharashtra

सुरुर येथून ट्रकमधून डिझेलची चोरी


Diesel stolen from truck at Surur
सुरूर, ता. वाई येथूनदोन ट्रकच्या डिझेल टाकीमधुन एकाने डिझेलची चोरी केल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

वाई : सुरूर, ता. वाई येथूनदोन ट्रकच्या डिझेल टाकीमधुन एकाने डिझेलची चोरी केल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २८ मार्च रोजी पावणे चार वाजण्याच्या सुमारास सुरुर गावच्या हद्दीत सुरूर ते वेळे जाणाऱ्या मार्गावर आशीर्वाद हॉटेल जवळ पार्किंग केलेल्या ट्रक क्रमांक के. ए. २२ डी २३४४ आणि के. ए. २२ डी  ६०७५ या दोन ट्रकच्या डिझेल टाकीचे लॉक तोडून अमोल श्रावण पाटील, रा. वाठार, ता. कराड याने ८ हजार ९०० रुपये किमतीचे डिझेल चोरून नेल्याची तक्रार भुईज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.